spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अत्यावश्यक कामांसाठी महावितरणचा ‘शटडाऊन’; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर :- रोहीत्र कार्यान्वयन, उपरी ते भुमिगत केबल आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी महावितरणतर्फ़े उद्या बुधावारी (दि. 15) महाल विभागात काही तासांकरिता वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

ग्राहकांनी या कामांमध्ये सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळू शकेल. या कामांमुळे सकाळी 9 ते 12 या वेळेत नवाबपुरा, मानपुरा चौक, गंगाबाई घाट रोड, आयाचित मंदिर रोड, लकडापूर, ताज नगर, फुले नगर, ज्ञानेश्वर नगर. सकाळी 8 ते 12 या वेळेत ओंकार नगर, सद्भावना नगर, स्वराज नगर, गजानन नगर, श्रीनाथ साई नगर, ग्रीन प्लेन कॉलनी, रघुवेंद्र नगर, सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत नंदनवन, एलआयजी, एमआयजी, एचआयजी कॉलनी आणि नंदनवन झोपडपट्टी या भागातील वीजपुरवठा बंद राहील

नागरिकांसाठी आवाहन:

ग्राहकांनी वीज पुरवठा बंद होण्यापुर्वी पाण्याची टाकी भरणे, मोबाइल फोन चार्ज करणे आणि इतर महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून ठेवावी. हा तात्पुरता वीज बंद ग्राहकांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी आहे, ज्यामुळे भविष्यात अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळेल. नागरिकांनी या कामात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.