spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दहावीच्या विद्यार्थ्यांचा मनसर येथे निरोप समारंभ

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील मनसर येथील चक्रधर स्वामी विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावुक वातावरणात पार पडला. शाळेतील शिक्षक, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुरेखा गायकवाड होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश सावंत उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा संपल्या, की शाळा-शाळांमधून निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला जातो आणि विद्यार्थीदेखील त्याची जोरदार तयारी करीत असते. नवीन कॉलेजविषयी औत्सुक्य असतं, तर आपली शाळा आणि तेथील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडावे लागणार याची रुखरुख असते. हे लक्षात घेऊनच या दिवशी संपूर्ण शाळा या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करतात, आत्मविश्वास निर्माण करतात आणि गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या मागे आहोत, हा विश्वास, आश्वासक आधारही देऊ करतात. प्रास्ताविकात दिनेश आडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांनी परिश्रम, शिस्त आणि ध्येयनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित करत यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन अनंति भजनी यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.