किशोर साहू, मौदा :- मंगळवार (ता.१७ नोव्हेंबर २०२६) रोजी चाचेर-निमखेडा जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गांगनेर येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) कृषी विभाग अंतर्गत खेत बचाओ अभियान कार्यक्रम राबविण्यात आले.
या अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये शेतीचे संरक्षण, जमिनीची सुपीकता टिकविणे, पीक व्यवस्थापन आणि शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करणे हा आहे.या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना शेतीचे महत्त्व, मृदसंधारण,पाणी व्यवस्थापन,पीक संरक्षण तसेच शेतीमध्ये योग्य कृषी पद्धतींचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन डॉ. किशोर त्रिभुवन , डॉ. जयकुमार वर्धन सीआयसीआर (CICR) नागपूर केंद्रीय कपास प्राधनिकी अनुसंधान संथान,नागपूर यांनी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हेमंत पिकलमुंडे,यांनी 
बीआरसी(BRC) अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रशांत शेंडे यांनी खेत बचाओ मोहीम अंतर्गत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आधुनिक तसेच शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून शेतीचे संरक्षण आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात यावे याबाबत माहिती देण्यात आली.
भीमराव जुमडे, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सदर कार्यक्रमादरम्यान महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी,महा विस्तार एआय(AI) अँप, फार्मर आयडी (ID), अलनिनोचा प्रभाव,रब्बी हंगामातील कमी पाण्याची पिके लागवड,शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व,मृदसंधारण,पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच शेतीमध्ये योग्य कृषी पद्धतींचा अवलंब करण्याबाबत व शेतकऱ्यांनी आधुनिक तसेच शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रदीप राऊत माजी सरपंच, श्रीधर वाघमारे सह महिला व पुरुष शेतकरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.






