हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती मागविली आहे.या अनुषंगाने थकीत कर्जदार सभासदाची माहिती संकलीत करुन विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम लाखनी तालुक्यातील प्राथमिक कृषि पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच भंडारा जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेच्या लाखनी तालुक्यातील शाखास्तरावर सुरु आहे.
तथापि सेवा सहकारी संस्थाचे थकीत कर्ज असलेल्या बऱ्याच सभासदानी अद्यापही त्यांचे आधार कार्ड,फॉर्मर आय डी व इतर आवश्यक असलेली माहिती संबंधित संस्थेच्या सचिवांना उपलब्ध करुन दिलेली नाही.त्यामुळे अशा थकीत कर्जदार सभासदांची विहीत नमुन्यातील माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्यास अडचण निर्माण झाली आहे.
सबब लाखनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांच्या ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदानी अद्यापही त्यांचे आधार कार्ड,फॉर्मर आय डी व इतर आवश्यक असलेली माहिती संबंधित सेवा सहकारी संस्थेला/दि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखेचे शाखा निरीक्षक यांचेशी त्वरीत संपर्क साधून त्यांचे आधारकार्ड व इतर आवश्यक माहिती त्यांना उपलब्ध करुन द्यावी,असे आवाहन रंजना सोनटक्के सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,लाखनी यांनी कळविले आहे.




