समाजसेवक दिगंबर धामणे यांच्या प्रयत्नाला यश
हळदगाव च्या सरपंच रेणुका धामणे कडून चालक व वाहकाचे स्वागत
नागपूर ९ :- नागपूर – वर्धा महामार्गावरील व महामार्गावरून थोडे आत मध्ये असलेल्या आजनगाव, घोडेघाट,भांसुली सावंगी, असोला, वडगाव तसेच हळदगाव येथील शाळकरी व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना सावंगी तसेच बुटीबोरी येथे शाळेत व महाविद्यालयात जाण्याकरिता बससेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे या सातही गावातील विध्यार्थ्यांना नियमित शाळेत जाता येत नव्हते.आजनगाव, भांसुली व घोडेगात येथील विध्यार्थ्यांना गावावरून पायदळ येऊन महामार्गावर येऊन बस ची वाट पाहत थांबावे लागायचे. अनेकदा विध्यार्थ्यांना ज्यादाचे पैसे देऊन खाजगी वाहनाने जीव धोक्यात टाकून शाळा महाविद्यालयात पोहचावे लागत असे. तेही वेळेवर पोहचवेल याची काहीही शाश्वती नव्हती.
विध्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी वाताहत बघून हळदगाव येथील समजसेवक व माजी सरपंच दिगंबर धामणे यांनी मनाशी ठाम निर्णय घेतला की विध्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी वाताहत आपण मार्गी लाऊच या उद्दिष्टाने त्यांनी दि १३ जुलै ला या सातही गावचे विध्यार्थी गाडीत बसवून आमदार समीर मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विध्यार्थ्यांना होणारा त्रास व शिक्षणाचे होणार नुकसान सांगितले. त्या अनुषंगाने आ समीर मेघे यांनी आगार प्रमुखाला पत्र देऊन या सातही गावच्या विध्यार्थ्यांना शाळेसाठी विशेष बससेवा सुरु करण्याची विनंती केली असता दि ३ ऑगस्ट पासून आजनगाव, घोडेघाट, हळदगाव, भांसुली, वाडगाव, सावंगी व असोला येथील विध्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु झाल्याने समाजसेवी दिगंबर धामणे यांच्या प्रयत्नाला यश आले. गावामध्ये अचानक आलेली बस बघून शालेय विध्यार्थ्यांना खूप आनंद झाला तर सरपंच रेणुका दिगंबर धामणे यांनी बसच्या चालक व वाहकाचे स्वागत केले




