– सरपंचासह गावकऱ्यांनी मानले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार
किशोर साहू, मौदा :- महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशनानुसार गुरुवार (ता.5 मार्च) ला ग्रामपंचायत भांडेवाडी येथे मौदा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावभेट कार्यक्रम पार पडला .
गट ग्रा पं भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या शिवाडौली येथील 75 टक्के गावकऱ्यांची पट्टे वाटपाची मागील अनेक वर्षापासूनची समस्या, या गाव भेटी दरम्यान अखेर निकाली काढण्यात आली व पट्टे वाटपाच्या मार्ग मोकळा करण्यात आला. याबाबत सरपंचा मंगला विष्णू देशमुख यांचे पती व अरोली – कोदामेंढी जि प सर्कल मधील भाजपचे नेते विष्णू देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. पट्टे वाटपाच्या मार्ग मोकळा झाल्याने सरपंच मंगला विष्णू देशमुख, समस्त ग्रामपंचायत सदस्यगण व शिवाडौली येथील नागरिकांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.




