spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रथम सत्र प्रवेशास २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

नागपूर ७ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रथम सत्रामध्ये आता बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठ संलग्नित व संचालित महाविद्यालयांकरिता तसेच पदव्युत्तर स्वायत्त शैक्षणिक विभागांसाठी शैक्षणिक वेळापत्रक १७ एप्रिल २०२५ नुसार निर्गमित केले होते. या वेळापत्रकात प्रथम वर्षात प्रवेशाची अंतिम तारीख ४ ऑगस्ट २०२५ नमूद होती. परंतु सत्र २०२५-२६ मध्ये विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून अध्यादेश क्रमांक २/१९७९ मधील तरतुदीनुसार कलगुरू महोदयांनी प्रथम सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रवेशाच्या अंतिम तारखेत २० ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढ केलेली आहे. सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केले असल्याचे विद्या विभागाचे सहाय्यक कुलसचिव  संजय भोयर यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.