spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कांद्रीत कुत्र्यांचा हल्ल्यात पाच शेळ्यांचा मृत्यु , एक गंभीर जख्मी

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण. 
 
कन्हान ३१ : – कांद्री नगरपंचायत अंतर्गत कांद्री बस स्टँड वार्ड क्रमांक दोन येथिल रहिवासी शेतकरी रमेश मस्के यांचा शेळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी मध्यरात्री हल्ला करू न पाच शेळ्यांचा मृत्यु झाला असुन एक शेळी गंभीर जख्मी झाली आहे. या घटनेमुळे कांद्री नगरपंचायत प्रशासना विरोधात नागरिकात रोष निर्माण झाला आहे .
          मंगळवार (दि.२९) जुलै ला रात्रीच्या सुमारास शेतकरी रमेश राजेराम मस्के वय ६३ वर्ष रा. कांद्री यांनी नेहमी प्रमाणे १२ शेळ्यांना शेडमध्ये बांधले होते. मध्यरात्री दरम्यान भटक्या कुत्र्यांनी शेळ्यांवर हल्ला केला. यात पाच शेळ्यांचा जगीच मृत्यु झाला तर एक शेळी गंभीर जख्मी झाली. सकाळी उठल्यावर रमेश मस्के यांना हा धक्कादायक प्रकार दिसुन आल्याने त्यांनी स्थानिक जनप्रतिनिधि, नागरिकांची मदत घेत कांद्री नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे याना घटनेची माहिती दिल्याने मुख्याधिकारी यानी घटना स्थळी पोहचुन पाहणी केली. पटवारी महेंद्र क्षीरसागर, कन्हान पोस्टे चे उपनिरीक्षक एकनाथ राठोड, कन्हान पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कापगते, सुहास पुंडे, वैभव लक्षणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पशु वैद्यकीय अधिकारी यानी त्वरित जख्मी शेळीवर योग्य उपचार केले. रमेश मस्के यांनी झालेल्या नुकसा नीसाठी शासना कडुन आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
           मागील काही दिवसा पासुन कांद्री परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यां ची संख्या वाढल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांमुळे रस्त्यांवरून किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. या गंभीर समस्या बाबत स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे यांना निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने यावर कुठलिही कारवाई न केल्याने शेतक री रमेश मस्के यांचे पाच शेळया भटक्या कुत्र्याच्या शिकार झाल्या. कांद्री नगरपंचायत प्रशासनाच्या अश्या दुर्लक्षतेमुळे नागरिकात रोष निर्माण होऊन तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांंनी तक्रार करुन ही प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेता दुर्लक्ष केल्याने शेतकरी रमेश मस्के यांना मोठे नुकसान झाल्याने शासन शेतकऱ्याला किती दिवसात आर्थिक मदत करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.