spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर कार्यालयात नगरसेवक विनय दाणी यांचे हस्ते झेंडावंदन 

नागपूर :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाल्मिकीनगर येथील नागपूर विभागीय कार्यालयाच्या परिसरात प्रभाग १५ चे नगरसेवक विनय दाणी यांचे हस्ते सकाळी ७.३० वाजता राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व राष्ट्रगीताचे गायन झाले.

त्यानंतर संस्था गीताचे गायन झाले. विनय दाणी यांचे स्वागत अग्निशमन अभ्यासक्रमाचे अध्यापक सुधाकर काळे यांनी केले. यावेळी विभागीय संचालक जयंत पाठक यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या शतकोत्तर इतिहासाची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे उपस्थितांनी अमली पदार्थ विरुद्ध शपथ घेतली.

यावेळी नागपूर महानगरपालिकेसोबत पल्स पोलिओ अभियानात काम केलेल्या विद्यर्थ्याना आरोग्य विभागाने पाठविलेली प्रमाणपत्रे श्री विनय दाणी यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. विनय दाणी यांनी उपस्थितांना स्वातंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

शेवटी सर्व सहकार्यांनी सामुहिकरित्या जयोस्तुते महान्मगले या गीताचे गायन केले व कार्यक्रमाची सांगता झाली. श्री सुशील यादव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी संस्थेचे सर्व अध्यापक, स्वच्छता निरीक्षक पदविका व अग्निशामक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Popular Articles