spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मानव वन्यजीव संघर्षावर मात करण्याकरिता वनविभागाने जबाबदारी घ्यावी

– पवनी येथे वनविभाग व नागरीकांत संवाद आणी चर्चा सत्र

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- तालुक्यात मानव व वन्यजीव यात मोठ्या प्रमाणात संघर्ष वाढलेला आहे. या गंभीर समसेवर मात करण्याकरिता वनविभागाने पुढाकार घेऊन जबाबदारी घ्यावी. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. वन्यजीव सप्ताहनिमित्य आयोजीत वनविभाग रामटेक, देवलापार व पवनी प्रादेशीक कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र आणि कार्यशाळेत मान्यवरांनी हा मुद्दा उपस्थित केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वित्तराज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल होते.

जयस्वाल म्हणाले, सध्या जंगलात वन्यप्राण्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध नसल्याने हे प्राणी शेतांमध्ये येतात आणि त्यांच्या मागोमाग वाघही गावाच्या दिशेने येतात. वाघाला शिकार मिळाली नाही तर मानवावर हल्ला करण्याच्या घटना घडतात. त्यामुळे जंगलात गवताचे कुरण आणि पाणवठे वाढविणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्राण्यांचे खाद्य जंगलातच उपलब्ध होईल आणि मानव-वन्यजीव संघर्षावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संजय करकरे यांनी मानव व वन्यजीव संघर्ष यावर पीपीटी द्वारे माहिती दिली. माजी जिल्हा परीषद सदस्या शांता कुमरे यांनी जंगल भागातील नागरीकांच्या समस्या मांडल्या. उपवनसंरक्षक नागपूर डॉ.विनीता व्यास, यांना नागरीकांशी संवाद साधला. तसेच नागरीकांनीही आपल्या समस्या मांडल्या. यावेळी रामटेकचे सहाय्यक वनसंरक्षक रामटेक जी.एफ.लुचे, पवनीचे वनपरीक्षेत्र अधिकारी सागर बनसोड, देवलापारचे वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले, रामटेकचे वनपरीक्षेत्र अधिकारी राहूल शिंदे, देवलापारचे ठानेदार नारायण तुरकुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय नेवारे व चंद्रकांत कोडवते, परीसरातील सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच पोलीस पाटील व नागरीक तसेच वनविभाग व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औषधीची शेती करा

उपवनसंरक्षक नागपूर डॉ.विनीता व्यास यांनी शेतीत लागतच्या मानाने पीक होत नाही व जंगली प्राण्यांचा त्रास होत असल्याने जंगलाच्या दिशेने औषधी निर्माण करण्याकरीता लागणारे उपज लावावे. त्याक रीता लागणारे साहित्य औषधी कंपण्या पुरवतील व त्याकरीता वनविभागामार्फत फंड उपलब्ध होवू शकतो तसेच त्या वनस्पतीला कोणतेही वन्यप्राणी खात नाही असा सल्ला दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.