spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बर्वे लेआऊट येथे सुवीधांसाठी नगर पलीकेला विसर पडला की! वेळ नाही ?

– लेआऊट मध्ये सांडपाण्याचा नाल्यांनसल्यामुळे आरोग्य धोक्यात

– न. प. बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार मुख्याधिकारी दोषी

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- रामटेक सारख्या विकसनशील शहरातील बर्वे लेआउट मध्ये विविध कर वसुली करूनही येथे सांडपाणी वाहून जाण्यासाठी आजपर्यंत नाल्या करण्यातच आलेल्या नाही. परिणामस्वरूप येथील नागरिकांच्या घरातील सांडपाणी घरांच्या सभोवताल साचते व येथे दुर्गंधी तथा डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने नगर पालिकेच्या बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघळ्यावर आला आहे. विकसनशील रामटेक शहरातील बर्वे ले-आउटमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचतयार केल्या नाहीत. आम्ही नगर परिषदेला कर कशासाठी देतो, अशी खंत तेथील रहिवाशांनी व्यक्त केली. दुर्गंधी आणि डासांमुळे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगत पालिका प्रशासनार रोष व्यक्त केला. विद्यमान मंत्री महोदयांचे निवासस्थान शहरात आहे, हे विशेष. तेथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बर्वे ले-आऊट फार जुना असूनही नगर परिषदेने आजपर्यंत नाल्यांचे बांधकाम केले नाही. दुसरी बाब म्हणजे गेल्या पंचवार्षिक योजनेतील तत्कालीन नगरसेवकांनी बर्वे ले-आऊटमधील हा गंभीर प्रकारही गंभीरतेने घेतला नाही. ते कां हे कळत नाही. नागरिकांचे आरोग्य, त्यांच्या सुविधांसाठी नगर पालिकेला विसर पडला की, वेळ नाही का? या शब्दात संताप व्यक्त केला आहे. नगर परिषदेची निवडणूक आता तोंडावर आहे. तेव्हा विचार करूनच मत मागायला या, असा इशाराच तेथील नागरिकांनी दिला आहे.

प्रस्ताव मंजुर झाल्यावर नालीबांधकाम

याबाबद नगर परिषद बांधकाम विभागातील अभियंता सौरभ कावळे यांना विचारणा केली असता पाच – सहा महिन्यांपुर्वी सदर कामाचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असुन मंजुरी आल्यावर बर्वे ले आऊट येथे नाली बांधकाम करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले. मात्र याऊलट बर्वे ले आऊट येथील नागरीकांनी ‘ या लेआउट मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून नागरिक वास्तव्यास असून काही वर्षांपूर्वीच नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने येथील नाली बांधकामाचा प्रस्ताव का पाठविला नव्हता ‘ असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

Popular Articles