spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भवानी माता मंदिरात माजी मंत्री सुनील केदार यांनी केली पूजा-अर्चना

– नवरात्रोत्सवात खापा शहर भक्तिमय वातावरणात मग्न; विविध मंदिरांत घटस्थापना, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

खापा, वार्ताहर :- नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता खापा येथील बाजार चौकातील प्रसिद्ध भवानी माता मंदिरात माजी मंत्री सुनील केदार यांनी पूजा-अर्चना केली. घटस्थापनेनंतर भाविकांनी भवानी माता, स्थापित कलश व दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी मंदिराचे विश्वस्त श्रीकांत चांदूरकर, देवराव दाढे, नगरसेवक मिलिंद बुरडे, संजय सोनकुसळे, आशीष ढाले, छगन कवडे, नामदेव गजभिये, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, सावनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित मुंगोले, खापा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश पावडे, समाजसेवक दिवाकर बोंदरे, सुनील शेंडे यांच्यासह अन्य भाविक उपस्थित होते.

शहरातील विविध मंदिरांत नवरात्रोत्सवाची धूम

खापा शहरातील माताखेडी, माऊली माता मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, काली माता मंदिर, अनुसूया माता देवस्थान, सटवा माता मंदिर आणि खोकला माता मंदिरासह विविध धार्मिक स्थळांवर दुर्गामूर्ती व घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे पाच वाजल्यापासूनच शहरातील मंदिरांमध्ये महिला व भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. पूजा-अर्चा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून विविध धार्मिक स्थळांवर पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नवरात्रोत्सवाला सुरक्षिततेचे कवच लाभले आहे.

Popular Articles