किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्र मुख्यमंत्री च्या मुख्य सचिव निलम प्रधान यांच्याशी आयटक प्रतिनिधि मंडळाने भेट घेत उमेद अभियान च्या अनेक समस्यांचे निवेदन पत्र आयटक चे महाराष्ट्र महासचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात सोमवार (ता. १२ ऑक्टोबर) ला दिले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष ज्योति अंडरसहारे, जिल्हा सचिव मीनल सोमकुंवर, जिल्हा संगठक संजय बिझाड़े, कविता मेश्राम, दिपाली मेश्राम ,मौदा तहसील अध्यक्ष मीनाक्षी डहाके, सचिव निशा वैद्य, सावनेर तहसील अध्यक्ष काजल लांजेवार, काटोल च्या प्रविणा खोब्रगड़े, मौदा उपाध्यक्ष काजल वानखेड़े, पदाधिकारीगण सुजाता कड़ू ,शारदा बिझाड़े उपस्थित होते. निवेदन देण्यापूर्वी शेकडो उमेद च्या महिला कॅडर यांनी संविधान चौकात मोर्चा आंदोलन करून ४ तास धरणे दिले. याला पाहता शासनाने पोलीस व्हॅन पाठवून प्रतिनिधी मंडळ यांना बोलावून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

आयटक पदाधिकारी महिला व शाम काळे यांनी सांगितले की, वेळेवर त्यांच्या समस्यांचे समाधान न झाल्यास जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र आणि क्रांतिकारी जेलभरो आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी आंदोलनात मौदा तालुक्याच्या गावा-गावातील आयटक पदाधिकारी महिला श्वाती डोरले, मंगला वासनिक, किरण बावने, पोर्णिमा सत्वालाखे, शिल्पा ठाकरे, सपना वकालकर ,प्रांजली भुते, प्रियंका हटवार , निकिता लोहबरे, अनिता मिरासे, शारदा मसके, भारती तांडेकर, राजकुमारी कछवाह, देवका भारती, सोनवाने, तांडेकर ,पोर्णिमा उकेटोने, प्रतिमा कुंडकार, जोसिका हटवार, वनिता पाटिल, प्राज्कता चौहान, उषा वाडिभस्मे, संगीता मानकर ,कोमल वैद्य, भावना सांडेल, हीरा चकोले ,सीमा अड़कने, माधुरी सोनवाने, दीक्षा चटप, ज्योत्सना ढोके, रोशना गभने, लता मेश्राम, संगीता कुसतकर, ज्योति मेश्राम ,अश्विनी मलवे, रूपाली डफर, शुंभागी बांगर, विमल उइके, वनिता पाटील ,रिना गोलाईत, दुर्गा आगे, वर्षा सिरसाम, चंद्रभागा कंगाले, प्रतिभा तितरमारे, आशा पडोले, सविता वैद्य ,कविता कारेमोरे सह जिल्ह्यातील आयटक पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








