spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

किट्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा २९ वर्षांनी स्नेहमिलन

– देश-विदेशातून १३० हून अधिक माजी विद्यार्थ्यांची हजेरी

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथे सन १९९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा (दि.२७) डिसेंबरला किट्सच्या सिल्व्हर जुबिली हॉलमध्ये दुपारी ३ वाजता उत्साहात पार पडला. या मेळाव्यास भारतासह विविध देशांतून आलेल्या १३० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे उद्घाटन किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अलुमनी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. मंगेश जयस्वाल, अलुमनी प्रतिनिधी उदय नागराजू, सुर्चा मल्होत्रा, प्रसाद किंमतकर, वरुण अग्रवाल, आकांक्षा रैस यांच्यासह सर्व विभागप्रमुख, डीन, प्राध्यापक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व किट्सचे माजी विद्यार्थी उदय नगराजू यांची युनायटेड किंगडमच्या हाउस ऑफ लॉर्ड्सवर नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली. ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या शिफारसीनुसार राजा चार्ल्स तृतीय यांनी त्यांच्या नियुक्तीस मान्यता दिल्याने संपूर्ण सभागृहात अभिमानाची भावना दाटून आली. एका भारतीयाची यूके हाउस ऑफ लॉर्ड्सवर नियुक्ती होणे ही किट्ससह संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यानिमित्त प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी उदय नगराजू यांचा विशेष सत्कार केला. आपल्या भाषणात डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी सांगितले की, किट्सच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जागतिक स्तरावर संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. मंगेश जयस्वाल यांनी केली. संचालन लोकेश श्रीवास्तव, प्रणीता सिंह व प्रा. अंजली नरड यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीतल काठिकर यांनी मानले.

Popular Articles