spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शाळेच्या बाकावरून : आगळीवेगळी स्नेहसंमेलने !

– माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला : किंमतकर 

– समर्थ प्राथमित शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नेहमी शाळेच्या गणवेशात असलेली मुले सांस्कृतिक महोत्सवानिमित्त विविध वेशभूषेमध्ये नटलेली पाहून श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर मला माझ्या बालपणीचे दिवसाच्या आठवणीच्या उजाळा मिळाला असल्याचे संबोधन केले. वर्षभर अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाची आवश्यकता आहे. अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होऊन त्यांना नवी ऊर्जा मिळते, नवे मार्ग सापडतात. याप्रसंगी चिमुकल्याने नृत्य तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचेही याप्रसंगी कौतुक करण्यात आले. समर्थ प्राथमिक शाळेत आयोजित कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. विद्यार्थ्याचे नृत्य पाहून उपस्थित मान्यवर तसेच पालकांनी टाळ्यांच्या माध्यमातून भरभरून दाद दिली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर, तर प्रमुख अतिथी उपाध्यक्ष कुसुम किंमतकर, मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर, मीनाक्षी प्रसाद किंमतकर, कुमारी रुजूला प्रसाद किंमतकर, समर्थ विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या लोखंडे, समर्थ कॉन्व्हेंट च्या उपप्राचार्य अंबागडे, ठोंबरे, पत्रकार तथा पालक समितीचे सदस्य पंकज बावनकर, आकाश ढोबळे, माजी नगरसेवक राजेश किंमतकर, शालेय पोषण आहार अधिक्षक शालिनीताई रामटेके, कडबे सर, समर्थ प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कविता संदीप जौंजाळ, शिक्षक ,शिक्षिका, कर्मचारी वृंद व सर्व पालक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

२२ नृत्यांचे सादरीकरण

कार्यक्रमात एकसे बढ़कर एक एकूण २२ नृत्यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान ५ जानेवारीला झालेल्या बालविज्ञान प्रदर्शनी २०२६ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले होते त्या सर्वांना आकाश ढोबळे यांचेकडून बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश्वरी लिमजे, अश्विनी पदम, प्रियंका धावडे, सबुरी खजुरे, शिल्पा जाधव, शालू वरटकर, अस्मिता येयेवर आदींसह इतर सर्व शिक्षकगण आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.