spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ साठी 221 कोटींचा निधी मंजूर

– विभागातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

 नागपूर :- आर्थिक वर्ष 2026-27 करिता ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ साठी राज्य शासनाने 221 कोटी 28 लाख 14 हजार 800 च्या निधीस मंजुरी दिली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांसह राज्यातील 21 जिल्ह्यातील निवड केलेल्या 7 हजार 201 गावांना याचा लाभ मिळणार आहे.

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या राज्यातील 7 हजार 201 गावांमध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ वर्ष 2025-26 पासून पुढील 6 वर्षाच्या कालावधीकरिता राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या टप्पा-2 च्या अंमलबजावणीसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 जुलै 2026 च्या शासन निर्णयानूसार 221 कोटी 28 लाख 14 हजार 800 च्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

सदर प्रकल्पाकरिता वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण 442 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या शासन निर्णयाद्वारे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांतील गावांमध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ ची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार असून या जिल्ह्यांतील निवड झालेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.