spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री नटवर बालाजी मंदिर समाज भवन दुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी; भूमिपूजन सोहळा उत्साहात

कामठी :- रनाळा येथील श्री नटवर बालाजी मंदिराच्या समाज भवन दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ भूमिपूजनाने करण्यात आला.

यावेळी समाज भवन दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून काम सुरू केल्याबद्दल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांचे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्याबद्दल मा. पंकजभाऊ साबळे, सरपंच, रनाळा यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

भूमिपूजन सोहळ्यास मंदिर अध्यक्ष महंत हरीमोहन दास महाराज, कार्यकारी अध्यक्ष नागोराव साबळे, सचिव कमलाकर मोहळ, सदस्य सतीश नवले, विजय दलाल, सुनील चलपे आणि आकाश कतारपवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील फुकटे, सुनीता नंदेश्वर आणि स्मिता भोयर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून समाज भवनाच्या दुरुस्तीमुळे परिसरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना अधिक चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.