Home Latest News हिवरा (गांगनेर)ला गणपती विसर्जन सोहळा थाटात संपन्न

हिवरा (गांगनेर)ला गणपती विसर्जन सोहळा थाटात संपन्न

0
82

किशोर साहू, मौदा, ता. 22: दरवर्षीप्रमाणे यंदाही गट ग्रामपंचायत गांगनेर अंतर्गत येणाऱ्या हिवरा (गांगनेर) येथे गणेश उत्सव पंचकमिटी ,भजन मंडळी व संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. शनिवार (दि. 20 सप्टेंबर)ला गणपती विसर्जन सोहळा थाटात संपन्न झाला. याप्रसंगी श्रावण बरबटकर, सोनू कुडे, लाला सोनसरे, ज्ञानेश्वर राऊत, अरुण येलेकार, सरपंचा अनिता चिंचूलकर, उपसरपंच मोतीराम घरजाळे, माजी सरपंच प्रदीप राऊत, ग्रामपंचायत सदस्य उमेश राऊत सह ग्रामपंचायत अंतर्गत येणारे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील महिला ,पुरुष मंडळी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.