गोंदिया २६ :- शहरात वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्या लोकांकरिता हि बातमी महत्वाची आहे याला कारण म्हणजे गोंदिया शहरात ठीक ठिकाणी लावण्यात आलेले ANPR कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत .त्यामुळे तुम्ही जर वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालविताना ANPR कॅमेऱ्यात कैद झाले तर तुमच्या वाहनावर ऑटोमॅटिक दंड आकारण्यात येईल आज याच प्रणालीचे शुभारंभ गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरखं भामरे यांचे हस्ते जिल्हा वाहतूक शाखेत करण्यात आले आहे
गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे येणे जाणे असते आणि अशा वेळेस शहरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी वाढत असते आणि त्यामुळे अनेक अपघात, चोरी, वाहतुकीचे नियम मोडने अशा विविध घटना होत असतात. यावर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा द्वारे गोंदिया शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. याच बरोबर ANPR कॅमेरे लावण्यात आले आहेत. जेणेकरून शहरांमध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे. आणि या नवीन पद्धतीच्या ANPR सीसीटीव्ही कॅमेरा मुळे चोरी, अपघात, वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. याच प्रणालीचे आज गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी उद्घाटन केले असून येत्या काळात गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या लोकांना ऑटोमॅटिक चालन कपेल हे मात्र निश्चित त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळूनच गाडी चालवावी. यावेळी गौरख भामरे पोलिस अधीक्षक, नागेश भास्कर वाहतूक पोलीस निरीक्षक सह वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते
Home Latest News गोंदिया सावधान! ANPR कॅमेऱ्यांची नजर तुमच्यावर नियम मोडल्यास होणार वाहनधारकांवर ऑटोमॅटिक चालन



