कामठी १० :- कामठी विधानसभा मतदार संघात कांग्रेस कडून मतचोरी झाल्याच्या आरोपाला विराम मिळत नाही तोच काल कामठी विधानसभा मतमोजणी केंद्र असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून निवडणूक आयोगामार्फत मिळालेल्या सरकारी वस्तू कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून या घटनेत एकूण 33 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झालेली आहे. ही घटना काल 9 सप्टेंबर ला रात्री 8 दरम्यान घडली .यासंदर्भात फिर्यादी राजेश चुटे वय 55 वर्षे रा सुभेदार नगर नागपूर ने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्राप्त माहितीनुसार कामठी विधानसभा निवडणूक निकाल ज्या मतमोजणी केंद्रातून जाहीर झाले त्या मतमोजणी केंद्र असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे ठेवण्यात आलेल्या निवडणूक साहित्याची देखरेख करणे व सुरक्षिततेच्या माध्यमातून दोन पोलीस नेमण्यात आले होते मात्र काही महिन्यांपूर्वी नेमलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविल्याने हे मतमोजणी केंद्र वाऱ्यावर होते याकडे कुणाचेही लक्ष नव्हते हीच संधी साधून अज्ञात चोरट्यानी या मतमोजणी केंद्रात अवैधरित्या प्रवेश करून तेथील स्ट्रॉंग मधील सिलिंग फॅन, 12 पंखे तसेच इलेक्षण साहित्याची स्टेशनरी असे एकूण 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे




