– शहरी रास्त भाव दुकानदाराना पारशिवनी गोडावुन मधुन धान्य पुरवठा करण्याची मागणी
कन्हान :– पारशिवनी तालुका शहरी रास्त भाव दुकानदाराना कामठी, मौदा व रामटेक गोडावुन मधुन येणारा धान्य कमी आणि वेळेवर मिळत नसुन तीन महिन्या चे वाटप असताना सुध्दा आता पर्यंत पुरवठा नसुन धान्य पोत्या मध्ये माल कमी येतो करिता अगोदर पार शिवनी गोडावुन मधुन माल पुरवठा होता तेव्हा कोण त्याही प्रकारची अडचण नसल्याने पुर्वरत पारशिवनी गोडावुन मधुन धान्य पुरवठा करण्याची मागणी रास्त भाव दुकानदार संघटना व्दारे तहसिलदार पारशिवनी हयाना निवेदन देऊन करण्यात आली.
पारशिवनी तालुक्यातील शहरात घेतलेल्या रास्त भाव दुकानदाराना कामठी, मौदा व रामटेक या गोडावुनमधुन येणारा धान्य माल कमी आणि वेळेवर मिळत नसुन तीन महिन्याचे वाटप असताना सुध्दा आता पर्यंत पुरवठा झालेला नाही. या गोडावुन मधुन येणा-या धान्य पोत्यामध्ये माल कमी येत करिता अगोदर आम्हा शहरी राशन दुकानदाराना पारशिवनी गोडावुन मधुन माल पुरवठा येत होता तेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. आज तीन महिन्याच्या वाटप मध्ये गहु आहे तर मक्का नाही. तांदुळ नाही, साखर नाही. मे महिन्याची ११ तारीख ओलाडुन गेली तरी मक्का, तांदुळ व साखरेचा पत्ता नाही. तेच पारशिवनी ग्रामिणचा तीन महिन्याचा वाटप होऊन संपला आहे. करिता पारशिवनी तालुक्यातील शहरी रास्त भाव दुकानदाराना पुर्वरत पारशिवनी गोडावुन धान्य पुरवठा करण्याची मागणी सुभाष वाघचौर तहसिलदार पारशिवनी हयाना रास्त भाव दुकानदार संघटना तालुका पारशिवनी च्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रूपेश बोंदरे, उपाध्यक्ष सुनिता मानकर, शकुंतला ककड, हदराज मदनानी, जी के कारेमोरे, नागेश झोडा वणे, रविंद्र मानवटकर, रंजना मेश्राम, इंद्रिरा चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते .