किशोर साहू, मौदा :- मागील सहा महिन्यापूर्वीपासून निमखेडा फाटकापासून मागील अनेक वर्षापासून त्रस्त वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी अंडरब्रिज व ओव्हरबीज चे काम फक्त शेवटचा टप्पा सोडून डेंटिंग पेंटिंग सह पूर्ण झालेले आहे. ब्लॉकहोल दिसत नसल्याने अंडरब्रिज चे काम अनिश्चित काळासाठी बंद असल्याचे अंडरब्रिजचे इंचार्ज शमशाद आलम यांनी अकरा मे ला भ्रमणध्वनी वरून सांगितले. आलम यांनी सांगितले की, ओव्हर ब्रिजचे काम मूळचे कंत्राटदार करत नसून मूळच्या कंत्राटदारांनी ते काम एका पेटी कॉन्ट्रॅक्टरला दिल्याचे सांगितले.![]()
ओवरब्रिज तयार झालेला ढाचा रेल्वे फाटकाच्या मधोमध माडंण्यासाठी दोन ते तीन मोठ्या जेसीबी ची गरज असून अजूनही त्या पेटी कॉन्ट्रॅक्टरदाराने त्या जेसीबी मशिनी, पावसाळ्याला फक्त पंधरा दिवस उरले असून, 12 मे पर्यंत आणलेल्या नाही. मधामधात दोन तीन माणसे येतात, काम सुरू झाल्यासारखे भासवतात व मग निघून जातात असे निमखेडा फाटकावरील गेटमॅन सौरव चंद्र यांनी आज मंगळवार 12 मे ला सकाळी नऊ वाजता ओवरब्रिज कामासंबंधी चर्चा करताना प्रत्यक्ष सांगितले. त्यामुळे जनतेचे करोडो रुपये खर्च करून हे ओवरब्रिज निमखेडा फाटकापासून त्रस्त वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर देखाव्यासाठी बनविले का? असा सवाल निमखेडा फाटकापासून कमालीचे त्रस्त जिल्ह्यातील वाहनधारकानी संबंधित विभागासमोर मांडलेला आहे.