Home Latest News जीवन शिक्षण विद्यालय पार्वती नगर येथील विद्यार्थ्यांचे एसएससी परीक्षेत घवघवीत यश

जीवन शिक्षण विद्यालय पार्वती नगर येथील विद्यार्थ्यांचे एसएससी परीक्षेत घवघवीत यश

0
3

नागपूर :- पार्वती नगर येथील जीवन शिक्षण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड परीक्षेचे उल्लेखनीय व संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेस यश मिळविले आहे. विद्यार्थ्यातील विद्यालयातील विद्यार्थी क्षितिज केशवराव नागदिवे यांनी 95 टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच (सक्षम धेंगरे यांनी 88. 60) (संकेत चौधरी यांनी 86.00) कणक अहिरवार व निहारिका धरोड यांनी ८२.२० तर (निखिल महतो यांनी 81.20) गुण प्राप्त करून विद्यालयाचे नाव उज्वल केले. या यशाबद्दल विद्यालयाच्या अध्यक्षा शोभा लक्षणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सचिव मंगेश कडू व कोषाध्यक्ष भालचंद्र कडू यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन पवार यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कौतुक करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी क्षितिज नागदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि तसेच आई-वडिलांना दिले.