spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रामगिताचार्य प.पु. तुकाराम दादा गीताचार्य जयंती ग्रामजयंती निमित्य कार्य हीच पूजा व श्रद्धांजली

-“सत्ता लोकांच्या हाती” Power To The People अभियानाचा कर्मयोगी प. पु. तुकारामदादा गीताचार्य प्रेषित सत्ता लोकांच्या हाती राष्ट्रीय अभियानाची सरन्यायाधीश भूषण गवई यांचे हस्ते दिल्ली येथे शुभारंभ:

– आम्ही संविधानासोबत आहो म्हणजे भारतीय नागरिकांसोबत आहोत भूषण गवई CJI

-“थेट लोकशाही Direct Democracy शिवाय लोकतंत्र अधुरे” प्रवीण जी.राऊत

– Power To The People सत्ता लोकांच्या हाती अभियानाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे हस्ते उदघाटन

दिल्ली :- We The People Of India म्हणजे आम्ही भारताचे लोक नागरिक अशी सुरवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत करण्यात आली आहे. संविधान निर्माते विश्वपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले भारतीय संविधान हे संपूर्णतः भारतीय नागरिकाला अर्पण केले आहे. लोकतंत्र संविधान हे मूलत: दोन तत्वावर आधारित आहे. एक Representative Demcracy म्हणजे प्रतिनिधीक लोकशाही व दुसरे Direct Dmocracy म्हणजे थेट लोकशाही. भारतीय नागरिकांचा अंतिम मूळ घटक हा गावात व वार्डात स्तिथ आहे. ग्राम तथा वार्डातला मूळ घटक हा संवैधानिक रित्या सक्षम व्हावा करिता सत्ता अधिकार शक्ती शेवटच्या मूळ घटकपर्यंत स्थापित व्हावी करिता 1956-96 साली पंचायत राज कायदा पारित करण्यात आला व 73 व्या 74 व्या घटना विस्तार Amenndment अनुसार ग्रामीण क्षेत्रात गावातील अधिकार ग्रामसभेला (ग्रामसंसद ) व शहरी भागात वार्डाचे अधिकार वार्डसभेला (वार्ड संसद) यांना सोपविण्यात आले. यालाच सत्तेचे विकेंद्रिकरण म्हणजे DeCentralisation of Power असे संबोधण्यात आले. नसता कुणाचे शासन न्यायाने वागती सत युगी जन त्याचेच नाव पंचायतन लोकतंत्र (लोकशाही) लोकांमाजी ॥ ग्रामगीता ॥ वंद.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या या तत्वानुसार Direct Democracy थेट लोकशाही म्हणजे ग्रामगणंराज्य स्थापने करिता संविधान सभेचे सदस्य प.पु.तुकारामदादा गीताचार्य यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करून तत्कालीन प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या कालावधीत पंचायत राज कायदा पारित करवून घेतला. त्यानुसार अनेक गावात ग्रामसभा स्थापन करून गावाचा संपूर्ण कारभार ग्रामसभेद्वारा सूत्र संचालित करून यशस्वी केला. या प्रयोगाचे अखिलभारतीय प्रायोगिक प्रत्यक्षिक केंद्र म्हणजे भूवैकुंठ अड्याळ टेकडी ठरले. संविधानातील या तत्वाचा प्रचार प्रसार व संपूर्ण देशात संस्थापन करून गावात ग्रामसभा व वार्डात वार्डसभा, तसेच ग्रामसंरक्षण वार्डसंरक्षण दल स्थापना करणे व सभेद्वारे गाव-वार्डातील युवा महिला जेष्ठ नागरी प्रतिनिधी पोलीस नागरिक समन्वयक Police Public Cordinetor निवडणे व त्यांची नियुक्ती समंधित पोलीस स्टेशन ला करणे. म्हणजे सत्ता लोकांच्या हाती Power To The People अभियानाचा शुभारंभ सरन्यायाधीश  भूषण गवई, सर्वोच्च न्यायालय न्यू दिल्ली, यांचे हस्ते पंचायतराज कायदा 243 क्यू नुसार स्थापित केंद्रीय ग्रामसभेचे अध्यक्ष व पोलीस नागरिक समन्वय समिती भारत चे प्रधान समन्वयक प्रवीण गुलाबराव राऊत यांचे अध्यक्षतेत, एड.रोशन बागडे (अध्यक्ष: District Bar Association Nagpur), महंत स्वामी सूर्यानंद गिरी (CEC:Member PPCC) पोलीस नागरिक समन्वय समिती प्रसंगी दिल्ली येथे उपस्थित होते.

प्रसंगी भूषण गवई यांना “भारतीय न्यायभूषण सन्मान “प्रदान करून समिती द्वारे सन्मानित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रामराज्य, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ग्रामराज्य, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जनशक्ती (Peoples Power), व संविधान निर्माते विश्वपूज्य डॉ. भीमराव आंबेडकर यांचे लोकतंत्र लोकशाही प्रजातंत्र म्हणजे By The People For The People To The People लोकांनी लोकांद्वारे लोकांसाठी चालविलेले म्हणजेच संत तुकाराम दादा गीताचार्य यांचे Power To The People सत्ता लोकांच्या हाती. गाव-वार्ड येथील नागरिक सक्षम तर देश सक्षम. करिता या अखील भारतीय वैश्विक अभियान विधिवत समिती वर्धापन दिन 4 नोव्हेंबर 1925 रोजी भुवैकुंठ अड्याळटेकडी येथून जाहीर करण्यात आलेल्या अभियानाचे उदघाटन, व पत्रकाचे विमोचन सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचे हस्ते दिल्ली निवास स्थानी संविधान दिनी दिवस करण्यात आले. आता संपूर्ण राज्य व देशात ही मोहीम पोलीस नागरिक समन्वय समिती भारत तर्फे केंद्रीय ग्रामसभेच्या मार्गदर्शनात व श्री गुरुदेव सेवा मंडळ, इतर स्वयंसेवी, संस्था, सेवा, संघाच्या, सहकार्याने राबविण्यात येईल असे केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष तथा प्रधान समन्वयक पोलीस नागरिक समन्वय समिती यांनी जाहीर केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.