spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे शिल्पकार वसंतराव नाईक यांना महावितरण व महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन

नागपूर :- महाराष्ट्राच्या आधुनिक कृषी व औद्योगिक विकासाचा पाया रचणारे, हरित क्रांतीचे प्रणेते आणि बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी आयुष्य वेचणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महावितरण आणि महानिर्मितीच्या वतीने आज कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. महावितरण आणि महानिर्मितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे आणि लोककल्याणकारी कार्याचे स्मरण केले.

या अभिवादन कार्यक्रमास महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता नारायण राठोड, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे व दिपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता अमित शिवलकर यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles