spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रा. प. बोरडा व्दारे स्वातंत्र दिवसी आंगणवाडीच्या मुलाना गणवेश वाटप 

कन्हान :- ग्राम पंचायत बोरडा (गणेशी) व्दारे १५ ऑगस्ट ८० व्या स्वातंत्र दिवसा निमित्य आंगणवाडीच्या चिमुकल्या मुलाना गणवेश वाटप करून स्वातंत्र दिवस सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

ग्राम पंचायत बोरडा (गणेशी) येथे सरपंचा रेखा बेनीप्रसाद डडुरे यांचे हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून तिरंगा ध्वज फडकवुन राष्ट्रीय गीताने सलामी देण्यात आली. यावेळी उपसरपंच नरेंद्र ठाकरे, सचिव संजय मेहर, ग्रा. प. सदस्य रामराव बंड, विलास बालकोटे, ग्रा. प. सदस्या संगिता टेकाम, स्वाती महाजन, सुनिता डडुरे, पुजा गडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी ग्राम पंचायत स्वायता निधीतुन सरपंचा रेखा डडुरे यांचे हस्ते आंगणवाडी बोरडा येथिल सर्व चिमुकल्या मुलाना गणवेश वाटप करून स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाबद्दल उपस्थित गावकरी नागरिकांनी सरपंच, उपसरपंच तथा सर्व सदस्याचे कौतुक केले. कार्यक्रमास गावातील जेष्ट मंडळी, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रा. पं. सचिव संजय मेहर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles