spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामगार नेते नरेश अडचुले यांचा सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार.

नागपूर 1 : महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगार नेते नरेश अडचुले आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सोमवारी एलआयसीतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने एलआयसी व्दारे त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा यशस्वीपणे पार पडला. याप्रसंगी एलआयसी पश्चिम शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अतुल कुमार धामणे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाखा व्यवस्थापक अतुल कुमार धामणे यांनी अडचुले यांच्या बाबत गौरवोव्दार काढताना ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देणाऱ्या त्यांच्या कर्तव्यदक्षपणा मुळेच पश्चिम शाखा अग्रणी असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे अनिल ढोकपांडे, अध्यक्ष,पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशन, प्रशासकीय अधिकारी चंदा वानखेडे, एजंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद ठोंबरे, अजय इत्तडवार, प्रदीप मेहरे, विकास अधिकारी देवेश रानडे, आनंद मुठाळ, मोईन खान राजू जैन आदींनी आपआपल्या भाषणातून नरेश अडचुले यांच्या विविध गुणांचे कौतुक करण्यासोबतच त्यांच्या कडून कोणत्या बाबी शिकण्यासारख्या आहेत याची माहिती दिली व त्यांना सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.
आपल्या सत्काराला उत्तर देताना नरेश अडचुले यांनी जीवनात आयुर्विम्याला व आयुर्विम्यात एलआयसीला पर्याय नसल्याचे गौरवोव्दार काढले. त्यांनी समस्त कर्मचारी, अधिकारी, विकास अधिकारी व अभिकर्त्यांनी सेवाकाळात दिलेले मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन व भक्कम पाठिंब्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. या निरोप समारंभाला कर्मचारी व अभिकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रास्ताविक मुकेश जुमडे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सहाय्यक शाखा व्यवस्थापक अजय खेडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्वश्री लता नंदनवार, राजेश चलपे, राहूल हरले, यतिंद्र बाकडे, वामन चलाख, शिरीष अणे, शशांक पुराणिक, मनोज बडकस, जॅान बागडे, बबलू हाते इ.नी कठोर परिश्रम घेतले.

Popular Articles