spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात ‘रस्ता सुरक्षा’ जनजागृतीसाठी भव्य वॉकेथॉन; तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), भंडारा यांच्या वतीने शहरात भव्य ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. ‘रस्ता सुरक्षा-जीवन रक्षा’ हा संदेश घेऊन निघालेल्या या रॅलीत सुमारे ३०० तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवून भंडारावासीयांचे लक्ष वेधले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आरटीओ कार्यालयापासून सुरू झाली. जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक आणि बसस्थानक यांसारख्या शहरातील प्रमुख मार्गांवरून ही वॉकेथॉन मार्गस्थ झाली. या मोहिमेत आरटीओ विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आणि अनाथपिंडक ॲथलेटिक्स क्लबचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली दरम्यान ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. “रस्त्यावरील शिस्त ही केवळ दंड टाळण्यासाठी नसून तुमचे प्राण वाचवण्यासाठी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच, पादचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. आरटीओ प्रशासन, पोलीस विभाग आणि तरुणाईच्या या संयुक्त प्रयत्नांचे शहरात कौतुक होत आहे.

Popular Articles