– सांस्कृतिक विभागाकडून मानधनात दुप्पट वाढ, नव्या कलाप्रकारांचाही योजनेत समावेश
हंसराज,भंडारा :- ब-याच दिवसांपासुन कलावंतांच्या मागण्या घेऊन प्रतिष्ठित कलावंत हि संघटना राज्यात राजभर आंदोलन करीत होती, कधी अधिवेशनात मोर्चे, तर कधी राज्यभर आंदोलन करुन कलावंतांच्या मागण्या घेऊन शासणास निवेदन देऊन मागणी करत आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या पावसाळी अधिवेशनात कलावंतांच्या विविध मागण्याचे निवेदन संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवचार यांच्या निर्देशानुसार राज्यातिल सर्व जिल्हृयामधुन प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कलावंतांच्या मागण्याचे निवेदने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांना देण्यात आले. त्यावर विषेश लक्ष देवून कलावंतांच्या ब-याच मागण्या सांस्कृतिक मंत्री महोदयानी मान्य केल्या. यात कलावंतांना शासनाकडुन अधिकृतपणे जिल्हा स्तरावर किंवा पंचायत समिती अधिकारी यांच्या हस्ते पडताळणी करुन त्यांना अधिकृत पणे ओळखपत्र दिले जाणार आहेत. तसेच राज्यातिल चार प्रकारच्या नविन कलावंतांना या अनुदान योजनेत हसभागी करुन घेतले आहे. यामध्ये नमन खेडे, जाकडी वही, गायन, तथा झाडीपट्टीतिल कला, या प्रकारच्या कलावंतांना सुध्दा यापुढे अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाने या योजने अंतर्गत प्रत्येक लोक कला पथकातिल 20 कलापथकांना प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे दहा लाख रुपये एवढे अनुदान देण्याचे शासणाने ठरविले आहे. कलावंतांच्या संदर्भात राज्यातिल काही आमदारांनी लक्षवेधी मध्ये कलावंताचे प्रश्न मांडले यामध्ये सदस्य निलेश राणे, भास्कर जाधव, सुनिल प्रभु यांचाही समावेश आहे. यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे सन्माननिय सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आषिश शेलार यांनी सदर योजनेचे विस्तारीकरण केले व कलावंतांच्या अनुदानात वाढ करत 2 कोटी 22 लाखावरुन 4 कोटी 44 लाख असे दुप्पटि करन करुन कलावंतांना जास्तित जास्त लाभ कसा देता येईल याकडे भर दिला. ज्या मागण्या प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान या संघटनेनी वेळोवेळी शासण दरबारी मांडल्या होत्या त्यातिल ब-याच मागण्या शाशणांनी मान्य केल्या त्याबद्दल प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान या कलावंत संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाहाणे तथा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासणाचे आभार मानले असुन उर्वरीत मागण्या शासण लवकरात लवकर मान्य करेल अशी आशा व्यक्त केली आहे.





