spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन

– राष्ट्रसेवा, एकात्मता आणि संघटन बळकटीचा संकल्प

कामठी :- भारतीय जनता पक्ष, कामठी शहराच्या वतीने जयस्तंभ चौक येथील भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती श्रद्धा, आदर आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित अभिवादन व मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी वक्त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रनिर्माण, शिक्षण क्षेत्र आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे राष्ट्रभक्ती, त्याग आणि समर्पणाने प्रेरित जीवन प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास शहराध्यक्ष मंगेश यादव, लालसिंग यादव, कमलकिशोर यादव, राजकुमार हाडोती, लालाजी खंडेलवाल, दिलीप बांडेबूचे, विजय कोंडूलवार, जयराम मेहरकुळे, उज्ज्वल रायबोले, प्रीतम यादव, नितीन रावेकर, रोहित तरारे, धीरज सोलंकी, अजय श्रीवास, नरेश खोकरे, देवानंद देशमुख, दिनेश शरण, हर्षल लिंबाचिया, लक्ष्मीकांत रंगारी, अभिलाष यादव, संध्या  रायबोले, प्रेमलता शर्मा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.