spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

SIR अभियानासाठी काँग्रेस सज्ज; बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे आवाहन

कामठी :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या SIR अभियानांतर्गत रविवारी (६ जुलै) कामठी तालुक्यातील रणाळा येथे कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातील BLA-2 ‘भारतरक्षक प्रतिनिधी’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.

शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील केदार यांनी बूथस्तरावरील संघटन अधिक सक्रिय करण्याचे निर्देश दिले.तसेच उपस्थित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाच्या BLA-1 प्रा. अवंतिका लेकुरवाळे, माजी नगराध्यक्ष शकूर नागानी, माजी सभापती दिशा चनकापुरे, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, नगरसेविका सातीका खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खासदार श्यामकुमार बर्वे यांनी मतदार नोंदणी, नावांतील दुरुस्ती, पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर सातत्याने संपर्क मोहीम राबवावी, असे आवाहन केले. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या प्रशिक्षण शिबिराला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय, इंटक तसेच BLA-1, BLA-2 आणि भारतरक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles