spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवीन कामठी पोलिसांनी दिले १९ गोवंशीय जनावरांना जिवनदान

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी गावाजवळ हरिहर नाटकर यांच्या शेतात कत्तलीसाठी तब्बल १९ गोवंशीय बैलांना चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरनाची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाड घालूंन कायदेशिर कारवाई करत 19 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची कारवाई काल सकाळी 10.30 दरम्यान केली. असून अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा, १९९५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ७ लाख ५५ हजार रुपयांचे १९ गोवंशीय बैल ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व जनावरे सुरक्षितरीत्या भांडेवाडी गोशाळा, नागपूर येथे पाठवून त्यांच्या चारा, पाणी व देखभालीची व्यवस्था करण्यात आली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके करीत आहेत.

Popular Articles