spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयी मार्गदर्शन

– सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची “जनगणना २०२७ ची तयारी” या विषयावरील विशेष मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत जनगणना प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, स्व-गणना (Self Enumeration), नागरिकांची भूमिका तसेच डिजिटल माध्यमातून होणाऱ्या जनगणनेविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग मंगळवार, दि. 19 मे 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तो पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

जनगणना २०२७ ही अधिक तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे श्री. पायस यांनी यावेळी सांगितले. “आमची जनगणना, आमचा विकास” या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, अचूक माहितीमुळे शासनाच्या विकास योजनांना योग्य दिशा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भागात स्व-गणनेसाठी अधिकृत पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया, लॉग-इन, ओटीपी पडताळणी, भाषा निवड, स्व-गणनेचे महत्त्व तसेच नागरिकांनी माहिती भरताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच घरगणना आणि लोकसंख्या गणना या टप्प्यांबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Popular Articles