spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मत वाचवा – देश वाचवा अभियानासाठी भंडारा काँग्रेसची आढावा बैठक

– गावोगावी नुक्कड सभा, चौपाल आणि जनसंवादातून जनजागृती करण्याच्या सूचना

हंसराज,भंडारा :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारला साखरकर सभागृहात संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निरीक्षक तथा माजी खासदार ॲड. अमी याग्निक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत मतदारांच्या हक्कांचे संरक्षण, मतदार यादीतील कथित अनियमितता आणि वोट चोरीचा मुद्दा यावर चर्चा झाली. पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या जनजागृती अभियानाचा आढावाही घेण्यात आला. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया असून त्याचे संरक्षण करणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. केवळ पक्षीय बैठका पुरेशा नसून कार्यकर्त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर, गाव आणि बूथ स्तरावर नुक्कड सभा, चौपाल व जनसंवाद कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्याबाबत तसेच मतदारांच्या हक्कांविषयी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. दिल्ली येथे आयोजित मोर्चाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या अभियानात जिल्ह्यातील संघटनेने सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव जिया पटेल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर, माजी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, मधुकर लिचडे, प्रमोद तितीरमारे, जयश्री बोरकर, स्वाती वाघाये, गणेश लिमजे यांच्यासह विविध सेल व फ्रंटल संघटनांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीतून जिल्ह्यात अभियानाला गती देण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली.

Popular Articles