चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत सरदार पटेल स्मारक तांत्रिक व्याख्यानमाला अंतर्गत “हायड्रॉलिक पंप्स: पॉवरिंग इरिगेशन सिस्टम” या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार उत्साहात पार पडला.
नुकतेच महाविद्यालयातील IE हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सेमिनारचे मुख्य वक्ते म्हणून इंजि. निलेश आगाशे, डेप्युटी इंजिनिअर (मेकॅनिकल विभाग), जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी हायड्रॉलिक पंप्सची कार्यपद्धती, सिंचन व्यवस्थेमधील त्यांचे महत्त्व तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान मिळाले. तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून आपले शंकानिरसन केले.![]()
कार्यक्रमाला यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. राजेश थोंबरे यांच्यासह प्रा. प्रविण पोटदुखे, प्रा. योगेश येनारकर, प्रा. अक्षय रोकडे आणि प्रा. अनुश्री येसेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी घुगुल यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. बी. आर. गुराम व प्रा. पी. जी. लाड यांनी समन्वयक म्हणून विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. बी. आर. गुराम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवांची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.