spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुरु म्हणजे यशस्वी जीवनाचा मार्गदाता  – प्राचार्य सुधाकर गजभिये.

खापा, ११ :  मानवी जीवनाच्या जडणघडणीत गुरूला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुष्याच्या वाटेवर चालताना योग्य ज्ञान, संस्कार, दिशा आणि खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देण्याचं कार्य गुरुच करू शकतात. म्हणूनच गुरूला यशस्वी जीवनाचा मार्ग दाता म्हटलेलं आहे. असे विचार प्राचार्य सुधाकर गजभिये यांनी व्यक्त केले.
स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले , गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना ना मिळे सन्मान. जीवन भव सागर तराया, चला वंदू गुरुराय ,गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तया पाशी, तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदयी धरू. जीवनात आई-वडिलांसोबतच योग्य गुरू मिळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या घरात शिक्षकांप्रती किंवा गुरुप्रती आदर नसतो त्या घरातील संस्कार लोप पावतात. म्हणून समाजात शिक्षकांचा गुरूंचा आदर होणे, हे सुद्धा निकोप समाजाचे  लक्षण आहे. याकरिता गुरूंनी सुद्धा समाजात वावरताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे. यावेळी मंचावर उपस्थित शिक्षकांनी सुद्धा गुरूंचे महात्मे आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या  गुरूंना श्रीफळ, लेखनी व पुष्पगुच्छ देत आपल्या भाषणातून गुरु विषयी गौरवोद्गार काढून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 12 वीची कुमारी कांचन बिसरे व वर्ग नववीची कुमारी कांती गावंडे तर आभार वर्ग बारावीची कुमारी प्रांजली झाडे व वर्ग नववी चा अभिषेक डोहळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा देवेंद्र धुंदे,  पंकज बावनकर, सौ धार्मिक, सौ मुक्ता कडू, राजेंद्र भोंगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले

Popular Articles