spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोरगाव येथे जिम साहित्य उद्घाटन व श्री गणरायाचे दर्शन

किशोर साहू, मौदा :- खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत मोरगांव येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून गावातील तरुण व मुलांना नियमित व्यायामासाठी जिम साहित्य मंजूर करण्यात आले होते. या नूतन जिम साहित्याचा लोकार्पण व उद्घाटनाचा सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला.या उपक्रमामुळे गावातील युवकांना आरोग्याची जोपासना करण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे.

याप्रसंगी अग्रवाल दांपत्याने मोरगांव येथील बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या लाडक्या बाप्पाचे (गणरायाचे) मनोभावे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य खात-रेवराल सर्कल राधा मुकेश अग्रवाल , माजी तालुका अध्यक्ष मौदा मंडळ मुकेश अग्रवाल, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश नन्होरे, गट ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गडे ,फागो साठवणे, प्रदीप बांगरे ,महादुले ,धुरपता भोयर , प्रियंका बांगरे , ग्रामपंचायत ऑपरेटर कमलेश भोयर, ग्रामपंचायत कर्मचारीवृंद परमेश्वर उके, सुरेश बोरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद वाघमारे,गिरधर विरुद्ध, गुलशन नन्होरे ,सागर बावणे , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वीय सहाय्यक अश्विन गुरुभेले आणि गावातील सर्व सामान्य नागरिक. परिसरातील तरुण, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.