spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संस्कृत भारती परीक्षेत एच.एस.महात्मे संस्कार विहार स्कूलचे घवघवीत यश

नागपूर :- संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संस्कृत भारतीतर्फे दरवर्षी सरल संस्कृत परीक्षा आयोजित करण्यात येते. यंदाच्या परीक्षेत एच. एस. महात्मे संस्कार विहार स्कूलच्या रुही सुनील नेवारे (इयत्ता ५ वी) आणि अशिनी अमर खोब्रागडे (इयत्ता ६ वी) यांनी उत्कृष्ट गुण संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाच्या शिक्षिका विद्या आळशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या संचालिका अरुणा काळमेघ यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विशेष प्रयत्न घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Popular Articles