spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

– दादाजी ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमातील वृद्धांची आरोग्य, बीपी, शुगर व कुष्ठरोग तपासणी; मोफत औषधोपचार

हंसराज,भंडारा :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून काल, १ ऑक्टोबर रोजी राजेंद्र वॉर्ड, भंडारा येथील ‘दादाजी ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रम’ येथे सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UHWC) भगतसिंग वॉर्ड, भंडारा यांच्या वतीने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान वृद्धांची रक्तदाब (BP) आणि मधुमेहाची (Sugar) तपासणी करण्यात आली. तसेच सध्या सुरू असलेल्या सक्रिय कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत (LCD – Leprosy Case Detection) उपस्थित सर्व ज्येष्ठांची कुष्ठरोग तपासणीही करण्यात आली व गरजूंना जागेवरच औषधोपचार देण्यात आले.

सदर शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. अझीम सैफी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) चक्षित लोणारे, एएनएम (ANM) वर्षा बांते आणि आशा स्वयंसेविका सुनंदा बसेशंकर यांनी उपस्थित राहून सेवा बजावली. या आरोग्य शिबिरासाठी दादाजी ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमातील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन करून तपासणीकामी आरोग्य पथकाला मोलाचे सहकार्य केले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनीही शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

Popular Articles