Home Latest News ‘आयटी’मधील तरुणाईच्या ह्रदयविकार समस्यांत पाच वर्षात वाढ!

‘आयटी’मधील तरुणाईच्या ह्रदयविकार समस्यांत पाच वर्षात वाढ!

0

<p><strong>मुंबई &colon;<&sol;strong> वर्क फ्रॉम होम संस्कृती&comma; सतत स्क्रीनसमोर बसून काम&comma; झोपेचे अयोग्य तास&comma; असंतुलित आहार आणि ताणतणाव या सर्वांचा परिणाम आयटी उद्योगातील तरुण कर्मचाऱ्यांच्या हृदयावर थेट होत आहे&period; जागतिक हृदय दिनानिमित्त &lpar;२९ सप्टेंबर&rpar; महाराष्ट्रासह देशभरातील मागील पाच वर्षांची आकडेवारी समोर येताच हे संकट स्पष्ट झाले आहे&period;<br &sol;>&NewLine;&OpenCurlyQuote;इंडियन हार्ट असोसिएशन’च्या अहवालानुसार भारतात हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल २५ टक्के मृत्यू ४० वर्षांखालील तरुणांमध्ये होत आहेत आणि त्यात आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे&period; आयसीएमआर-एनसीडी रिसर्च २०२३ च्या माहितीनुसार २०१८ मध्ये तरुण आयटी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण ७ टक्के होते ते वाढून २०२२ मध्ये थेट १३ टक्क्यांवर पोहोचले आहे&period;<br &sol;>&NewLine;कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आयटी हब म्हणजेच बंगळुरू आणि पुणे येथील रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत आयटी क्षेत्राशी संबंधित हृदयविकाराच्या रुग्णांत तब्बल ६० टक्के वाढ झाली आहे&period; तर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२३ या कालावधीत ३० ते ४५ वयोगटातील आयटी कर्मचाऱ्यांच्या हृदयविकारामुळे आकस्मिक रुग्णप्रवेशांत ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे&period;<br &sol;>&NewLine;आयटीमधील लोकांना १०-१२ तास संगणकासमोर बसून काम करावे लागते&comma; अपुरी झोप आणि फास्ट फूड संस्कृती यामुळे तरुण वयोगटात कोलेस्टेरॉल&comma; उच्च रक्तदाब आणि मधुमेह वेगाने वाढतो आहे आणि हे तिन्ही घटक हृदयविकाराचे मुख्य कारण ठरत असल्याचे मुंबईतील ह्रदयविकार तज्ज्ञ डॉ&period; गजानन रत्नपारखी यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>आयटी क्षेत्रातील ४०-४५ वर्षांखालील अनेक तरुण हृदयविकाराच्या झटक्यामुळे आपत्कालीन विभागात दाखल होतात&period; यासर्वांशी बोलताना एक लक्षात आले ते म्हणजे त्यांना असलेली धुम्रपानाची सवय तसेच कामाचा ताण&period; नोकरीमधील अस्थिरता हाही एक प्रमुख भाग आहे ज्यामुळे तणावाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते&period;<&sol;p>&NewLine;<p>परदेशस्थ कंपन्यांमध्ये भारतातून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक विचित्र असते&period; ही मंडळी तेथील वेळेनुसार येथे रात्रभर काम करतात आणि दिवसा झोपतात&period; यातूनच मग खाण्यापिण्यापासूनचे सर्व वेळापत्रक बदलते ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरारवर होत असल्याचे डॉ रत्नपारखी म्हणाले&period; याचा विचार करता एकूणच आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यसनांपासून शंभर टक्के दूर राहाणे आवश्यक आहे&period; त्याचप्रमाणे संतुलित आहार व व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ गजानन रत्नपारखी यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>SOURCE &colon; LOKSTTA<&sol;p>&NewLine;

Exit mobile version