spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान: पंचनामे करा? 

– भाजपा रामटेक मंडळ अध्यक्ष योगेश म्हात्रे यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यात बुधवार व गुरुवार ला परतीचा अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पाऊसामुळे शेतातील धान पीक भुईसपाट झाले. आता तोंडाला आलेला धानपिक जमीनदोस्त झाले. मौजा पंचाळा(बु.), पंचाळा(खु.), गुगुलडोह व मांद्री या भागातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शुक्रवारी (ता. ३१) भाजपा रामटेक मंडळ अध्यक्ष तथा पंचाळा (बु.) ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश म्हात्रे यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदार रमेश कोळपे यांना निवेदनातून केली. शेतकरी शेतमाल निघाल्यावर तो विकुन कर्ज फेडण्याच्या विचारात असतानाच अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. पंचनाम्याला उशीर करून नये. लगेच पंचनामे करून नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. तहसीलदार कोळापे यांना निवेदन देताना उपसरपंच योगेश रमेश म्हात्रे, चंद्रकांत बैस, शिशुपाल बागडे, कुणाल बागडे, हिराचंद बागडे, शरद पचारे, बाळकृष्णा बागडे, ब्रम्हा नान्हे, संजय माटे, रामभाऊ वडीचार, रितेश परतेती, महिपाल बागडे, राकेश मांढरे, तेजराम कुंभले, शरद कुंभले आदी शेतकरी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.