– नुकसानगस्त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत करावी. – माजी जी. प सदस्य कारेमोरे
कन्हान :- परिसरातील कन्हान व टेकाडी आणि गोंडे गाव जी प सर्कल मध्ये झालेल्या जोरदार वादळ, वा-या सह पावसाच्या अवकाळी अतिवृष्टी मुळे अनेक शेतक-यांच्या शेतातील धान, मिरची, कापुस व इतर पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने नुकसान गस्त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी पारशिवनी नायब तहसिलदार रमेश पागोटे मार्फत शासनाला निवेदन देऊन केली आहे.
बुधवार (दि.२९) ऑक्टोंबरला माजी जी प सदस्य व्यकट कारेमोरे हयानी मा.तहसिलदार पारशिवनी हयाच्या कार्यालयात शेतक-यासह भेट देऊन (दि. २५) तारखेला सायंकाळी सहा वाजता पासुन कन्हान व परिसरातील जि प टेकाटी व गोंडेगाव सर्कल मध्ये जोरदार वादळ, वा-या सह पावसाच्या अवकाळी अति वृष्टीमुळे अनेक शेतक-यांच्या शेतातील धान, मिरची, कापुस व इतर पिकाचे अतोनात नुकसान झालेले असल्याने नुकसानगस्त शेतक-यांच्या शेत पिकाचे पंचनामे करून योग्य अहवाल शासनाकडे पाठवुन ऐन दिवाळीत शेतक-यांचे अतोनात नुकसान होऊन दिवाळे निघाल्याने शासनाकडुन योग्य आर्थिक मदत मिळवुन देण्यास मदत करावी. असे विनंती अर्ज नायब तहसि लदार रमेश पागोटे हयाच्या मार्फत निवेदन देऊन मागणी माजी जि प सदस्य व्यकट कारेमोरे हयानी केली आहे. यावेळी डुलीचंद झाडे, धनराज चकोले, शिवराम धावडे, रामचंद चकोले सह इतर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.




