नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मिहान येथील हेक्झावेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. महाराज बाग चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात असलेल्या दीक्षांत सभागृहात बुधवार, दि. १७सप्टेंबर २०२५ रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. आरोग्य अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
आरोग्य अभ्यासक्रमाशी संबंधित डिप्लोमा इन फार्मसी, बीफार्म, डीएमएलटी, बीएमएलटी, हेल्थकेअर डोमेन मधील पदवी, बीएससी (सामान्य विज्ञान) आदी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरीता या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, हेक्झावेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सीनियर एचआर एक्झिक्युटिव्ह ईशानी कोटकर, एचआर ऑफिसर अथर्व ठोंबरे उपस्थित होते. या प्लेसमेंट ड्राईव्ह करिता 119 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दिवसभर चाललेल्या प्रेस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये आरोग्य क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कंपनीकडून प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एचआर, मॅनेजर तसेच डोमेन चाचणी द्यावी लागणार आहे.




