spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कायद्यामध्ये सुधारणा करून मराठा समाजाला स्वतंत्र १०% आरक्षण द्यावे

कन्हान :- श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर जि. नागपुर व्दारे मुख्याधिकारी दिपक घोडके नगरपरिषद कन्हान-पिपरी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस यांनी मरा ठा समाजाला स्वतंत्र १० % आरक्षण देण्यात यावे‌ तथा सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये. हैद्राबाद गैझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर रद्द करण्यात यावा अशी निवेदनातुन मागणी करण्यात आली.

तो जी आर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा तथा ओबीसी समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्यांसाठी आत्मघातकी असल्यांसारखा आहे. सात ते आठ कोटी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केले तर २७ % ओबीसी आरक्षण ते आता च्या परिस्थितीत ओबीसी समाजाला मिळणारे फक्त १९ % मिळते. त्यातही सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीचे आरक्षण नगण्य होऊन जाईल. ज्यामुळे ओबीसी प्रवर्गाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, विकास मंदावेल. मराठ्यांचे आर्थिक मुल्यांकन होऊन ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही त्यांना कायद्यामध्ये सुधारणा करून स्वतंत्र १० % आरक्षण द्यावे. जेणेकरून ओबीसीच्या आरक्ष णाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळावे. जर बिना आंदोलन करता सवर्ण समाजाला आरक्षण केंद्र शासन देऊ शकते. तर मराठ्यांना का बरं नाही. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. जेणे करून ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होणार नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहरा व्दारे करण्यात आली आहे. तसेच सरकारने निवेदनाला सकारात्मक घेऊन योग्य तो मार्ग काढुन न्याय द्यावा. यावेळी निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो असे आश्वासन मुख्याधिकारी दिपक घोडके यांनी संघटनेला दिले. शिष्टमंडळात संपर्क प्रमुख नागपुर जिल्हा सुर्यभान चकोले, कन्हान शहराध्यक्ष सुनिल सरोदे, कार्याध्यक्ष वृषभ बावनकर तथा पदा धिकारी विनोद किरपान, अविनाश कांबळे, चंद्रशेखर बावनकुळे, सचिन सरोदे, निर्णय कुंभलकर‌, जंयत कुंभलकर, पंकज वंजारी, भगवान ला़ंजेवार, वामन देशमुख‌ आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.