spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हॉट मिक्स प्लांटतर्फे शहरातील रस्ते दुरुस्तीचे कामास सुरुवात

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे शहरातील रस्ते दुरुस्तीचे कार्य केले जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हॉट मिक्स विभागाद्वारे रस्ते दुरुस्तीचे काम केले जात आहे.

मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने हॉट मिक्स प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.,यामुळे प्लांटच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली असून, याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. पावसाळ्यात सुद्धा हॉट मिक्स प्लांट विभागाने शहरातील रस्ते व खड्डे बुजविण्याचे काम यशस्वीपणे केले. जून आणि जुलै महिन्यात एकूण 41 हजार 411 चौरस मीटर क्षेत्राची रस्त्यांची कामे करण्यात आली. याच काळात शहरातील 2114 खड्डे बुजविण्याचे काम हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून करण्यात आले. आता हॉटमिक्स प्लांटचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांच्या मागंरदशनात हिंगणा हॉट मिक्स प्लांटचे उपअभियंता प्रफुल्ल आसलकर आणि स्थापत्य अभियंता सहायक विनायक चव्हाण यांच्या मदतीने प्लांटचे संचालन करून करण्यात येत आहे.

मनपाच्या दहाही झोनमध्ये रस्ते दुरुस्तीचे काम करण्याकरिता मनपातर्फे स्मेरा मेहता यांची Arems आणि एस.के. गुरूबक्षांनी या दोन एजन्सी निवड करण्यात आली आहे. याशिवाय मनपातर्फे दोन पथक तयार करण्यात आले आहे. पहिल्या पथकात उपअभियंता अभिजीत भुरे व कनिष्ठ अभियंता अंकुश कुवर आणि दुसऱ्या पथकात उपअभियंता मनोहर राठोड आणि स्थापत्य अभियंता सहायक शैलेश जांभुळकर यांचा समावेश आहे. पहिले पथक धंतोली, लक्ष्मीनगर, मंगळवारी, हनुमाननगर, नेहरुनगर या झोनमध्ये तर दुसरे पथक गांधीबाग, सतरंजीपुरा आणि लकडगंज या भागाततील रस्त्यावरील खड्डे बुजविणार आहेत. हॉट मिक्स प्लांट विभागातर्फे रामनगर येथील पांढराबोडी आणि रामदासपेठ येथे केयर हॉस्पीटलपासून ते कल्पना बिल्डिंग पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता अभिजीत भुरे यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.