मागील तीन महिन्यांमध्ये ४१ हजार चौ. मीटर रस्त्यांची दुरुस्ती
नागपूर, ता. १२ : नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात शहरातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हॉट मिक्स विभागाद्वारे उत्तम कार्य करण्यात आले आहे. सदर काळात शहरातील ४१ हजार ४११ चौरस मीटर क्षेत्रफळांच्या रस्त्यांची डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात आली. याच काळात शहरातील रस्त्यांवर पडलेले २११४ खडे बुजविण्यात हॉट मिक्स प्लांटला यश आले.
नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे नुकतेच आधुनिकीकरण करण्यात आले. यामुळे प्लांटच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने हॉट मिक्स प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात आले, याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. ऐन पावसाळ्यात सुद्धा हॉट मिक्स प्लांट विभागाने शहरातील रस्ते व खड्डे बुजविण्याचे काम यशस्वीपणे केले. हॉट मिक्स प्लांटचे आधुनिकीकरण केल्यानंतर तेथे पॅचर मशीन व इतर अत्याधुनिक साधने उपलब्ध झाल्याने रस्त्यांचे पॅच वर्क करणे त्वरित केले जात आहे.
जून महिन्यात १५ हजार ३४५ चौरस मीटर क्षेत्रफळात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच जुलै महिन्यात ११ हजार ७०९ चौरस मीटर तर ऑगस्ट महिन्यात १४ हजार ३५६ चौरस मीटर अशी एकूण ४१ हजार ४११ चौरस मीटर क्षेत्रातील रस्त्यांची कामे केली. याच काळात शहरातील २११४ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यात जून महिन्यात ६४१ खड्डे बुजविण्यात आले. तसेच जुलै व ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे ५४६ व ९२७ खड्डे बुजविण्याचे काम हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून झाल्याचे हॉट मिक्स प्लांटच्या कार्यकारी अभियंता श्री.अजय डहाके यांनी कळविले आहे.




