spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 61 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर, ता. १२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.  गुरूवार (ता.11)  रोजी शोध पथकाने 61 प्रकरणांची नोंद करून 30,900/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800/- रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 7,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून रु.9,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध धरमपेठ झोन अंतर्गत मे.तारा एक्‍झिबीशन  यांनी  विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रू.10,000/-चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत यांनी मे.पुष्पा एजन्सी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. आर्शीवाद अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- रूपयांची  दंड वसूली करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत अरविंद स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.देवकी स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत जय कुकरेजा यांनीसिवेज लाईन मनपाच्या चेंबरला जोडल्यामुळे रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.40,000/- दंड वसूल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.