spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपुरात मानवी कवटी आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याने खळबळ

चंद्रपूर :- शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या प्रियदर्शिनी चौक परिसरात मानवी कवटी, तर त्यालगतच्या रेल्वे रुळाजवळ कुजलेल्या अवस्थेतील छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात तर्कवितर्कांना उधाण आले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रियदर्शिनी चौकाजवळील पाण्याच्या टाकी परिसरात काही नागरिकांच्या निदर्शनास अत्यंत विदारक अवस्थेत एक मानवी कवटी आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी ही कवटी पूर्णतः कुजलेली असून, भटक्या श्वानांनी तिचे लचके तोडल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले.

फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाकडून शोधमोहीम

कवटी आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करून परिसरात कसून शोधमोहीम राबवली. या तपासादरम्यान प्रियदर्शिनी चौकापासून अगदी जवळच असलेल्या रेल्वे रुळाजवळ एक छिन्नविच्छिन्न व कुजलेला मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचेही काही भाग श्वानांनी खाल्ल्याचे दिसून आले आहे.

मृतदेह आणि कवटी एकाच व्यक्तीची?

घटनास्थळी सापडलेली मानवी कवटी आणि रेल्वे रुळाजवळ आढळलेला मृतदेह एकाच व्यक्तीचा आहे का? याबाबत पोलिसांना दाट संशय आहे. मात्र, मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने अद्याप ठोस पुरावा हाती लागलेला नाही. पोलिसांनी पंचनामा करून अवशेष व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण, कालावधी आणि मृत व्यक्तीची ओळख स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हा घातपात आहे की अपघात, या दिशेने सखोल तपास सुरू केला आहे.

Popular Articles