Home Latest News मनपातर्फे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

मनपातर्फे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

0
58

नागपूर :- विज्ञान क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती, भारतरत्न. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतरत्न. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी देखील पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. याप्रसंगी स्वप्नील लोखंडे अमोल तपासे, प्रमोद हिवसे राजू लोणारे, कमलेश जंजाळ, अनिकेत यादव, जितेश धकाते, शुभम राऊत,राज चौधरी, अनिकेत आटे, शैलेश जांभूळकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.