spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाद्वारे लोकमान्य टिळक अन् थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- भारतीय असंतोषाचे जनक थोर देशभक्त “लोकमान्य” बाळ गंगाधर टिळक व थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकाद्वारे विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपाच्या मुख्यालयातील महापौर कक्षासमोर महापौर निता ठाकरे यांनी दोघांच्याही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्वतच महाल भागातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला उपमहापौर लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

यावेळी नगरसेवक मनोज साबळे यांच्यासह इतर उपस्थित होते. तसेच सीए रोडवरील चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यालाही उपमहापौर लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

मनपा मुख्यालयातील छोटेखानी समारंभात मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता अनिल गेडाम, प्रकल्प अभियंता राजीव गौतम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, प्रवीण वानखेडे यांनीही पुष्पांजली अर्पण केली.

Popular Articles